नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाकडून देशभरात एसआयआरची प्रक्रिया सुरू आहे. याला विरोधक विरोध करत आहेत. याच पारश्वभूमीवर आज कॉकरोचने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, आंदोलस्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनीदिल्ली विमानतळावर विमानातूनच सीजेपी अध्यक्ष अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले आहे. यानंतर या तिघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
अभिजित दीपकेला कुठे घेऊन गेले पोलीस? दास, रांका कुठे? -
ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी या तिघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी नेले आहे. आयजीआय विमानतळावर विमानातून ताब्यात घेतलेल्या अभिजीत दीपके याला दिल्ली पोलिसांनी हरियाणातील गुरुग्राम येथे घेऊन गेले आहेत. तर सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना जफरपूर कलां आणि बाहरी दिल्ली, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.